लोकशाही पंधरवडा निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि स्वा.रा.ती.म.वि.नांदेड राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे मतदान जागृती रैलीचे आयोजन करण्यात आले होते त्यामधे वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय रासेयो च्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला
समाजात स्वच्छतेचे महत्व रुजवण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी करावे.
– आमदार मोहन अण्णा हंबर्डे
मुजामपेठ दि10: समाजामध्ये स्वच्छतेचे महत्व रुजवण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी करावे असे प्रतिपादन नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी केले ते वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय नांदेड च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष वार्षिक युवक शिबिराच्या उदघाटन प्रसंगी मौजे मुजामपेठ येथे बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले तीलावत ए कुराण पाक खलील उर रहमान हम्द खुदसिया खान तर नात जवेरिया अफगान यांनी सादर केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विधिज्ञ मोहम्मद बाहोद्दीन मोहम्मद अहमदोद्दीन हे होते यावेळी विचारपीठावर संस्थाध्यक्ष प्राध्यापक महम्मद मजरोद्दीन,राष्ट्रवादीचे गंगाधर पाटील कवाळे,मुख्याध्यापक बालासाहेब डाकोरे,प्र.प्राचार्य डॉ.उस्मान गणी,माजी सैनिक शिवाजीराव हंबर्डे, राज मोहम्मद, कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक बाबासाहेब भूकतरे हे विराजमान होते.पुढे आमदार हंबर्डे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपली नाळ नेहमी ग्रामीणभागाशी जोडून ठेवली पाहिजे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना ग्रामीण जीवनाचा जवळून अनुभव घेण्याची संधी देते. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास व व्यक्तिमत्व विकास होण्यास देखील मदत होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बानो एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोहम्मद मझरोद्दीन यांनी केले यावेळी गंगाधर पाटील कवाळे यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले अध्यक्षीय समारोप मोहम्मद बाहोदिन मोहम्मद अहमदोद्दिन यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक बाबासाहेब भुकतरे यांनी तर आभार प्रभारी प्राचार्य डॉ. उस्मान गणी यांनी व्यक्त केले यावेळी प्रा. खान नदीम परवेज ,प्रा. शेख नजीर, प्रा. डॉक्टर सुभाष रगडे, प्रा. अनवरुद्दीन ,प्रा. अब्दुल अहमद प्रा.नगमा अंजुम, मोहम्मद फराज,संदीप पाटील जांभरुणकर,महंमद दानिश सय्यद मुदस्सीर, शेख समीर, फरहान खान,शेख शफी व मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वंयंसेविका उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली